बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून नेऊन 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार
बीड | Beed Crime: गेल्या काही दिवसांपूर्वीच, बीड आणि परळीत घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाचं, आता पुन्हा जिल्ह्यात 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्री 12 च्या दरम्यान घरातून उचलून नेऊन, 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी गावात उघडकीस आली आहे. सुंदर तायड (वय 25 रा. रामपुरी) असे या नराधमाचे नाव आहे.
आरोपी सुंदर तायड याने बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान, पीडितेच्या घराबाहेर चकरा मारत होता. यादरम्यान त्याला पीडितेच्या आईने घराजवळून हाकलून दिले. मात्र मध्यरात्री 12 च्या दरम्यान नराधम आरोपी सुंदर, पुन्हा दारूच्या नशेत आल्यामुळे, पीडितेची आई घराजवळील आपल्या भावाला झोपेतून उठविण्यासाठी गेली असता, सुंदरने पीडित 6 वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून अज्ञातस्थळी नेऊन त्या चिमुरडीवर अत्याचार करून तो फरार झाला. याप्रकरणी रात्री उशिरा बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यात, 376 व पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावात सामूहिक बलात्काराची, त्यानंतर अवघ्या काही दिवसात परळीत देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: 6-year-old girl abducted and tortured