Home अहमदनगर अहमदनगर: धनादेश न वटल्याने कर्जदारास ६ महिन्यांची शिक्षा

अहमदनगर: धनादेश न वटल्याने कर्जदारास ६ महिन्यांची शिक्षा

Breaking News | Ahmednagar: आरोपीस ६ महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. 

6 months punishment for debtor for non-cashing of cheque

कोपरगाव: शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला ५ लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगाव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगाव येथील न्यायाधिश भगवान पंडित यांनी आरोपीस ६ महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस ६ लाख ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस. डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: 6 months punishment for debtor for non-cashing of cheque

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here