महिला सरपंचासोबत १५ जणांचं संतापजनक कृत्य, घरात जबरदस्तीने घुसून..
Crime News: महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केल्याची घटना.
बुलढाणा: संतापजनक घटना समोर आली आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक पाऊलं उचलण्याची मागणी होत असताना घटना घडत आहे. एका महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावात ही संतापजनक घटना घडली आहे. रमाबाई जाधव असे या जखमी झालेल्या महिला सरपंचाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ डिसेंबर) १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली.
तू फुकट सरपंच झाली, असं म्हणत आरोपींनी महिला सरपंचासह तिच्या मुलावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ जखम झाली आहे. या घटनेनंतर महिला सरपंचाने थेट जानेफळ पोलीस ठाणे गाठले पण तिथे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. पण तिथूनही या महिला सरपंचाला परत पाठवण्यात आले.
दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर सरपंच रमाबाई जाधव या बराच वेळ जानेफळ पोलीस स्टेशनला ताटकळत बसल्या होत्या. तरीही मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्या हतबल झाल्या. त्यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असूनही पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: 5 persons forcibly entered the house of the female sarpanch and beat crime filed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App