इगतपुरी: भावली धरणात बुडून 5 जणाचा मृत्यू
Breaking News | Nashik: भावली धरणात बुडून 5 जणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना. तीन तरुणींचा समावेश.
इगतपुरी: इगतपुरी येथील भावली धरणात बुडून 5 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते, त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करुनते पाण्यात पोहोण्यासाठी गेले असता ही भीषण दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वी स्थानिक आदिवासींनी घरणाकडे धाव घेतली होती.
भावली धरणात बुडालेले सर्वजण नाशिक रोड परिसरातील रहिवाशी आहेत. रिक्षा बाजुला लावून पोहोण्यासाठी धरणात उतरले असता सर्वजण बुडाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी, धरणात उतरल्यामुळे एकापाठोपाठ एक सर्वच पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम स्थानिक आदिवासी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी बांधवांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: 5 people death after drowning in Bhavli dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study