Home अहमदनगर मीटर बसविण्यासाठी मागितली २० हजारांची लाच सहायक अभियंत्यावर गुन्हा

मीटर बसविण्यासाठी मागितली २० हजारांची लाच सहायक अभियंत्यावर गुन्हा

Ahmednagar News: रिसॉर्टचे काढून घेतलेले वीज मीटर पुन्हा बसवून देण्यासाठी २० हजारांच्या लाचेची (Bribe) मागणी केल्याप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्यावर गुन्हा दाखल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

20,000 bribe demanded for installation of meters Crime on Assistant Engineer

अहमदनगर: कृषी पर्यटन रिसॉर्टचे काढून घेतलेले वीज मीटर पुन्हा बसवून देण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील महावितरणच्या सहायक अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश युवराज पवार (रा. नवलेनगर, पारिजात चौक, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, शरद गोरडे, पोलिस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनार, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड आदीं पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  महावितरणच्या अभियंत्यांनी तक्रारदार यांच्या आंभोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील आंबेश्वरी कृषी पर्यटन रिसॉर्टसाठी घेतलेजे मीटर छेडछाड केले म्हणून काढून नेले होते. त्यांनी चिंचोडी पाटील येथील महावितरणच्या उपकेंद्रातून वीज जोडणी घेतली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी चिंचोडी पाटील येथील उपकेंद्रात पुन्हा मीटर जोडून द्यावे, यासाठी पाठपुरावा केला. मात्र महावितरणकडून ते दिले गेले नाही. वीज मीटर पुन्हा बसविण्यासाठी वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्या नावाने तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम न देता तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपी पवार याने तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून लाचेची खात्री करत पवार याच्याविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Web Title: 20,000 bribe demanded installation of meters Crime on Assistant Engineer

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here