संगमनेरात नोकरीचे अमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक, एकास अटक
Breaking News | Sangamner Crime: पाटबंधारे खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून एका भामट्याने तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना.
संगमनेर: पाटबंधारे खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून एका भामट्याने तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी वसंत होलम (रा. तेलीखुंट चौक, संगमनेर) याचे मिक्सर व गिझर रिपेअरींगचे दुकान आहे. दुकानामध्ये किशोर भाऊसाहेब सरोदे (रा. घुलेवाडी ता. संगमनेर) हा किरकोळ भांडे विकत घेण्यासाठी आला होता. त्यानंतर तो अनेकदा या दुकानात आला. आपण एका जातीचे आहोत, मी सैन्य दलात नोकरीला होतो असे तो सांगायचा. पाटबंधारे खात्यातील एक व्यक्ती मयत झाली आहे, त्याची जागा खाली आहे. आपलं कोणी घरातील जवळचा इच्छुक उमेदवार असेल तर सांगा, आपण नोकरी लावून देऊ असे त्यांनी सांगितले, यानंतर होलम याने मावसभाऊ किरण वाघमारे याच्यासोचत चर्चा करून सरोदे याला किरण वाघमारे यास नोकरीला लावून द्यावे, असे सांगितले पाटबंधारे खात्यातील नोकरीसाठी अगोदर २ लाख रुपये व नोकरी लागल्यावर चार लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर त्याने किरण वाघामारेचा जातीचा दाखला, १० बी, १२ बीचे गुणपत्रक, बीकॉमचे सर्टिफिकेट, उत्पनाचा दाखला आदी कागदपत्रे मागितली, होलम व बाघमारे यांनी २ लाख रुपये दिले. त्यानंतर ऑगस्ट २०१२ मध्ये तीन पेपर आहेत, त्यासाढी २५ हजार रुपये लागतील असे सांगितले. ते पग किरण बाघमारे याने ट्रान्सफर केले. त्यानंतर १५ दिवसांनी असे सांगितले. तेथे डिपार्टमेंटमध्ये आपली ओळख आहे, असे सांगितले व पुन्हा पैसे मागितले, त्याप्रमाणे आम्ही पैसे दिले, त्यानंतर त्याने तुमचा ऑरडर नंबर आला आहे, असे सांगत ऑर्डर नंबरही आम्हाला दिला.
सरोदे याने एकूण १५ लाख ११ हजार ७५३ रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर अनेकदा फोन केल्यानंतर वेगवेगळे कारण सरोदे याने दिले. पैसे मागितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर होलम याने संगमनेर शहर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
फिर्यादीवरून किशोर सरोदे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०१४ भारतीय दंड संहिता कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किशोर सरोदे याम शहर पोलिसांनी अटक केली असून त्यास ककाल संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करत आहे.
Web Title: 16 lakhs fraud in Sangamner, one arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study