नगरमध्ये १३३ तोळे सोने जप्त, ३४ हजार रुपयांची रोकड
Breaking News | Ahmedngar: लॉजवर थांबलेल्या दोघांकडून बिले नसलेले ९३ लाख १५ हजार ३९७ रुपयांचे सोने व ३४ हजार ७०० रुपयांची रोकड असा ९३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त.
नगर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नगरमधील माणिक चौकातील लॉजवर थांबलेल्या दोघांकडून बिले नसलेले ९३ लाख १५ हजार ३९७ रुपयांचे सोने व ३४ हजार ७०० रुपयांची रोकड असा ९३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. सोने व रक्कम पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहेत.
रमेशसिंह हेरसिंह राजपूत (वय ४७, रा.पाली, राजस्थान), नारायणलाल हेमराज गाडरी (वय २७, रा. चित्तौडगढ, राजस्थान) अशी दोघांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला ५० हजारापेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. ५० हजारापेक्षा अधिक रक्कम मिळून आल्यास जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला सुचित करावे लागते. रमेशसिंह हेरसिंह राजपुत (रा. राजस्थान) हा कुठलीही अधिकृत बिले नसताना सोन्याची दागिने विक्रीसाठी आल्याची माहिती १२ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना माहिती मिळाली. त्यांनी माणिकचौकातील लॉजची तपासणी करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता ९३ लाख १५ हजार ३९७ रुपयांचे सोने व ३४ हजार ७०० रुपयांची रोकड असा ९३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला.
Web Title: 133 tola gold seized in the city, 34 thousand rupees in cash
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study