Home अहमदनगर बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, १३ वर्षाचा मुलगा जखमी

बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, १३ वर्षाचा मुलगा जखमी

13-year-old boy injured in leopard attack

श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील आनंदवाडी परिसरात ऊस तोडणी मजुरांनी थाटलेल्या राहूटीवर बिबट्याने हल्ला (leopard attack) केल्याने रुद्र ज्ञानेश्वर कांबळे रा. सिल्लोड या १३ वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहूटी नितीन नरवडे यांच्या शेतात तयार केलेली आहे. बिबट्याने हल्ला केल्याने रुद्र हा जखमी झाला आहे. रुद्राला तातडीने काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण जखम मोठी असल्याने उपचारासाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम सिव्हील रुग्णालयात मुलाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आनंदवाडी परिसरात बिबट्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यानच्या काळात एक गायीचे वासरू जखमी केले होते.

Web Title: 13-year-old boy injured in leopard attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here