12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून रेल्वे स्थानक परिसरात सोडले
Breaking News | Mumbai Crime: नराधमाने अत्याचार केल्यानंतर पीडितेला रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिले.
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमाने अत्याचार (abused) केल्यानंतर पीडितेला रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिले. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोर आली आहे. पिडीत मुलगी ही अनाथ आहे.
नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित मुलगी ही 12 वर्षांची आहे. घणसोली रेल्वे स्थानकात ही मुलगी अस्वस्थ अवस्थेत बसल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं.
अस्वस्थ दिसणारी मुलगी गस्ती पथकाला दिसली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या मुलीची अधिक चौकशी केली. त्यावेळी ती अनाथ असल्याचं आढळून आले. पोलिसांनी पीडितेसोबत संवाद साधत तिला विश्वासात घेतले. या दरम्यान तिच्यासोबत वाईट कृत्य झाल्याची भीती त्यांच्या मनात आली. त्यानंतर त्यांनी या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले. या पीडितेवर शहरी भागात अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिला रेल्वे स्थानक परिसरात नराधमांनी सोडले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाशी रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन ही अनाथ असल्याने तिला सध्या आश्रमशाळेत ठेवण्यात आले आहे.
Web Title: 12-year-old girl was raped and left in the railway station area
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News