Home संगमनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवस्ती(मालूंजे) शाळेत संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवस्ती(मालूंजे) शाळेत संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवस्ती(मालूंजे) शाळेत संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
संगमनेर: आज शुक्रवार दिनांक 20/07/2018 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवस्ती(मालूंजे) या ठिकाणी शाळेच्या वॉल कंपाउंड (संरक्षक भिंत) बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मालूंजे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदीपराव घुगे,उपसरपंच छबुराव सोसे,सदस्य सुभद्रा चौधर,यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
संरक्षक भिंतीच्या कामामुळे शाळेच्या भौतिक परिस्थितीत चांगली सुधारणा होणार असल्याचे मत सरपंच संदिप घुगे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी बाळू चौधर,भाऊसाहेब चौधर, भागा चौधर,रामदास आव्हाड,ज्ञानदेव सोसे,बबाबाई चौधर,सीताराम चौधर,गौरव बुरकुल,बंटी बुरकुल,राजेंद्र आव्हाड,अनिल आव्हाड,रमेश चौधर व इतर ग्रामस्थ तसेच अनिकेत थोरात व ग्रामसेवक देवकर साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजू कुदनर व उपाध्यापक टकले सर तसेच ग्रामस्थांसह इतर मान्यवर व मालूंजे गावातील तसेच चौधरवस्ती परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.