Home अहमदनगर अहमदनगर: बारावीच्या विद्यार्थीनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर: बारावीच्या विद्यार्थीनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

Breaking News | Ahmednagar: १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या युवकाला अटक.

youth who abducted the 12th student was arrested

अहमदनगर: नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या युवकाला नगर तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या तीन तासांत पकडले. सोहेल मकबूल शेख (रा. वाळकी, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या जबाबावरून त्याच्यावर पोक्सो व अत्याचाराचे वाढीव कलमही लावण्यात आले असून, न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

नगर तालुक्यातील वाळकी गावात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी ही नगर शहरातील राहणारी असून, तिचे आई-वडील मृत झाले असल्याने ती नातेवाइकांकडे नगर तालुक्यातील एका गावात राहत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू झाल्यावर एक महिन्यापूर्वी ती वाळकी गावात दुसऱ्या नातेवाइकांकडे राहत होती. वाळकीतील सोहेल शेख याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि पळून जाऊन लग्न करू असे म्हणून तिला फूस लावली. त्यानंतर बुधवारी (दि. २०) सायंकाळी सातच्या सुमारास ती घरातून गायब झाली.

थोड्या वेळात नातेवाइकांना शंका आल्यावर त्यांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला. नगर तालुका पोलिसांनाही कळविण्यात आले. गावात दोन समाजाचा जमाव जमला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग पोलिस पथकासह वाळकीत दाखल झाले. हा ‘लव जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप काही नागरिकांनी पोलिसांकडे केला.

पोलिसांनी तत्परतेने नागरिकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध सुरू केला. काही वेळाने पोलिसांना ते दोघे गावच्या शिवारात असलेल्या एका मळ्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेत त्या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी सोहेल हा ‘त्या’ मुलीला रात्रभर त्या मळ्यात ठेवून सकाळीच तिला घेऊन गुजरातला पळून जाणार होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

पीडित मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सोहेल शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गुरुवारी (दि. २१) दुपारी मुलीने दिलेल्या जबाबावरून त्यात पोक्सो व अत्याचाराचे कलम वाढविण्यात आले आहे. आरोपी सोहेल याने पीडितेला पळवून नेल्यावर मळ्यात तिच्यावर अत्याचार केल्याचा जबाब पीडितेने दिला आहे. त्यानुसार वाढीव कलम लावण्यात आले. आरोपीला दुपारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग करत आहेत.

Web Title: youth who abducted the 12th student was arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here