अहमदनगर: तरुणावर कुऱ्हाडीने वार करून गोळीबार
Breaking News | Ahmednagar: तरुणावर कुऱ्हाडीने वार करून गोळीबार.
अहमदनगर : ट्रॅव्हल्स व्यवसायातील वादातून पाच जणांनी तरुणावर कुन्हाड, चॉपर व दगडाने प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान तरुणाच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री शहरातील कोठला परिसरात हा थरार रंगला. सरवर अस्लम शेख (वय ३३, रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर), असे हल्ल्यातील जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी हल्यात जखमी झालेल्या सरवर याने हॉस्पिटलमध्ये दिलेल्या जबाबावरून दानिश फारुख शेख ऊर्फ धन्या, साहिल (पूर्ण नाव माहीत नाही), उफेर ऊर्फ लाल्या (पूर्ण नाव माहीत नाही), गणेश पोटे व तालीब (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सरवर व आरोपी दानिश शेख या दोघांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. २५ एप्रिल रोजी सरवर याचा दानिश व साहिल यांच्यासोबत ट्रॅव्हल्सच्या प्रवासी सीट भाड्यावरून माळीवाडा बसस्थानक येथे किरकोळ होता. २७ एप्रिल रोजी वाद झाला रात्री बारा वाजेच्या सुमारास सरवर हा त्याच्या मित्राबरोबर कोठला येथे बाकडावर बसला होता. याचवेळी तेथे आलेल्या दानिश व साहिल यांनी सरवर याच्यावर कुन्हाडीने वार केले. हे वार याच्या हातावर लागले. यावेळी हा पळून जात असताना उफेर व पोटे याने त्याच्यावर चॉपरने सरवर गणेश तर तालीब याने दगड फेकून मारला.
दरम्यान, दानिश याने बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सरवर याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या फिर्यादीवरून आरोपींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. जखमी सरवर याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. अशा स्थितीत शहरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरवर शेख याने दिलेल्या फिर्यादीत ‘मेंबरने जसे सांगितले तसे कर’ असे आरोपी एकमेकांशी बोलतानाचा उल्लेख आहे. शहरात नगरसेवकाला ‘मेंबर’ असे म्हटले जाते. त्यामुळे या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.
Web Title: youth was stabbed to death with an axe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study