Home संगमनेर संगमनेरात तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, उपसरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

संगमनेरात तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, उपसरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: २६ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण.

youth was brutally beaten with an iron rod in Sangamner

संगमनेर: शहराजवळील अकोले रोड परिसरातील एका हॉटेल समोर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार जणांनी एका २६ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजिंक्य रंगनाथ सावंत (२६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कसारा दुमाला येथील उपसरपंच अमोल एकनाथ वाळके, दीपक सुदाम वाळके, नीलेश शिवाजी वाळके, संकेत मल्हारी वाळके या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२२ मे रोजी पिडित अजिंक्य रंगनाथ सावंत त्याचे काका दीपक कैलास सावंत आणि कसारा दुमाला हे त्याचा भाऊ विकास सावंत यांच्यासह अकोले रोडवरील हॉटेलमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पीडित अजिंक्य सावंत यांनी गावचे उपसरपंच अमोल एकनाथ वाळके यांना सांगितले की, गेल्या एक वर्षापासून आमच्या शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर करावयाच्या कामाची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली होती. परंतु रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांना आणि इतर लोकांना अडचणी येत आहेत. त्याने त्याला रस्त्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले, त्यावर अमोल वाळके म्हणाला, ‘तू कोण विचारणारा ?’ आम्हाला वाटेल तेंवा आम्ही काम पूर्ण करू. अमोल वाळके तिथून निघून गेला. सुमारे अर्ध्या तासानंतर, पीडित व्यक्ती जेवण करून हॉटेलच्या गेटवर आली तेव्हा अमोल एकनाथ वाळके, दीपक सुदाम वाळके, नीलेश शिवाजी वाळके, संकेत मल्हारी वाळके कसारा दुमाला यांनी पीडित अजिंक्यच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून त्याला खाली फेकले. त्यांनी त्याला लाथा, ठोसे आणि काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

यानंतर, पीडित अजिंक्यचा भाऊ विकास सावंत, जो त्याच्यासोबत होता, त्याला वाचवण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही नीलेश शिवाजी वाळके आणि संकेत मल्हारी वाळके यांनी पकडले. त्यानंतर अमोल एकनाथ वाळके यांनी अजिंक्यचा कॉलर पकडला आणि चारचाकी गाडीतून लोखंडी रॉड काढून त्याच्या डाव्या कानावर मारला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Breaking News: youth was brutally beaten with an iron rod in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here