अहमदनगर: खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा बळी, कंटेनरने तरुणाला चिरडले
Ahmednagar Accident: कंटेनरने तरुणाला चिरडल्याची घटना.
राहुरी: दुचाकीवरून घराकडे निघालेल्या औरंगाबाद येथील योगेश सहादेव सानप या 27 वर्षीय तरूणाचा नगर मनमाड रस्त्यावरील खड्याने बळी घेतल्याची दुर्देवी घटना शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी परिसरात घडली. राहुरी फॅक्टरी येथे कंटनेरने तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान राहुरी येथे एका तरुणाचा चार दिवसापूर्वी खड्यामुळे बळी गेल्यानंतर गुरुवारी डिग्रस फाट्यावर खड्यामुळे एका महिलेला आपला जिव गमवावा लागला. तर शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथे एका तरुणाचा खड्यामुळे जिव गेला. आठवड्याच्या आत या रस्त्याने तिन बळी घेतले आहेत. हा रस्ता आणखी किती बळी घेणार? आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक वर्षांपासून नागरीकांचीओरड सुरूच आहे. परंतू राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होऊनही नगर मनमाड रस्त्याचे दारिद्र्य कमी होईनासे झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊनही रस्त्याची अवस्था जैसै थै आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून अनेक निष्पाप लोकांना हकनाक जिव गमवावा लागत आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व स्विकारावे लागत आहे.
Web Title: youth victim due to potholes, young man crushed by container Accident