रक्तरंजित थरार, तरुणाकडून तिघांवर कोयत्याने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू
Breaking News | Ch Sambhajinagar Crime: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात तिघांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात तिघांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत ही भयंकर घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि एकाने तिघांवर सुऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मित्राला शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणातून चिकन शॉपवर काम करणाऱ्याने तीन तरुणांवर मांस कापायच्या सुऱ्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
डोके, छातीत सुरा खुपसला गेल्याने नितीन सोनाजी संकपाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ आणि मित्र दत्ता बालाजी जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. रात्री 9 वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या पुढे असणाऱ्या चिकन शॉपसमोर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन संकपाळ, सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव हे तिघे जण गप्पा मारत बसले होते. तेव्हा कुरेशीच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना याचा मित्र समीर शेखसोबत त्यांचा वाद झाला.
समीर शेखने शिवीगाळ करीत तिघांना धक्काबुक्की केली. मस्तान कुरेशीने अचानक वादात उडी घेत तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली. आधी शाब्दीक बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की नंतर हाणामारी झाली. त्यानंतर मस्तान कुरेशीने दुकानातून सुरा आणून तिघांवरही हल्ला चढवला. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. यामधील नितीनचा जागीच मृत्यू झाला. संभाजीनगर पोलिसांनी मध्यरात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अधिकचा तपास पोलीस करीत आहे.
Breaking News: Youth stabs three people with a scythe one dies