Home अहमदनगर अहिल्यानगर: दुचाकी व एसटी बसच्या अपघातात तरूण ठार

अहिल्यानगर: दुचाकी व एसटी बसच्या अपघातात तरूण ठार

Ahilyanagar Bike and ST Bus Accident: दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तरूण ठार झाल्याची घटना घडली.

Youth killed in accident between bike and ST bus

राहुरी:  राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावरील  डिग्रस फाट्याजवळ सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात युवराज भुजाडी हा तरूण ठार झाल्याची घटना घडली. जोगेश्वरी आखाडा येथील युवराज कैलास भुजाडी (वय 21) हा सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी नगर एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. तो दररोज त्याच्या दुचाकीवर ये-जा करत असे.

सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान युवराज भुजाडी हा नेहमी प्रमाणे त्याच्या दुचाकीवर नगर एमआडीसी येथे कामाला जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याजवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणार्‍या एसटी बसची जोराची धडक बसली. या धडकेत युवराज भुजाडी हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय आधिकार्‍यांनी घोषित केले.

Web Title: Youth killed in accident between bike and ST bus

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here