Home जळगाव अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, शेतात आढळला मृतदेह

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, शेतात आढळला मृतदेह

Breaking News | Jalgaon Crime:  एका जिनिंगच्या मागे असलेल्या शेतात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.

Youth killed due to immoral relationship, body found in field

जळगाव: आव्हाणे रस्त्यावरील एका जिनिंगच्या मागे असलेल्या शेतात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी एका महिलेसह तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेश परमसिंग सोलंकी (वय २६) असे तरुणाचे नाव आहे. गेहिज खेमला (जि. सेंधावा, मध्यप्रदेश) येथील मूळ रहिवाशी असलेला सुरेश सोलंकी हा लक्ष्मी जिनींग येथील कामगार खोली येथे वास्तव्यास होता. दरम्यान लक्ष्मी जिनिंग मागील शेतात सुरेश सोलंकी याचा मृतदेह २० एप्रिलला शेतात काम करणाऱ्या कामगारांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक, किशन नजन पाटील त्यांनी घटनास्थळी येत मृताची ओळख पटविली.

मृत सुरेश हा लक्ष्मी जिनिंगमध्ये ठेकेदार मनोज सोनवणे यांच्याकडे कामाला होता. १९ एप्रिलला दुपारी तो मनोज सोनवणे याला भेटून गेला होता. शनिवारी तो कामावर न आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. श्वान पथकाने दाखवलेला मार्ग, सीसीटिव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय असून एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Youth killed due to immoral relationship, body found in field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here