संगमनेर: तेवीस दिवसांपासून युवक बेपत्ता
Sangamner Youth Missing: राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने दिघे कुटुंबियांसह तळेगाव परिसरात मोठी चिंता.
संगमनेर: जयहिंद आदिवासी आश्रमशाळा कोळवाडे (ता. संगमनेर) येथील शिक्षक अविनाश दिघे यांचा मुलगा ध्रुव हा १ जानेवारी, २०२५ पासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने दिघे कुटुंबियांसह तळेगाव परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. ध्रु
व हा १७ वर्षांचा असून १ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून तो बेपत्ता झाला आहे. त्याने मेहंदी रंगाचे जॅकेट व नारंगी रंगाचा फूल टी-शर्ट घातलेला आहे. काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज व चष्मा लावलेला आहे. गेल्या तेवीस दिवसांपासून त्याचे नातेवाईक सर्वत्र शोध घेत असून अजूनही ध्रुवचा पत्ता लागला नाही. त्यामुळे आई-वडील, नातेवाईक, चुलते महेश दिघे यांच्यासह सर्वजण चिंतेत आहेत. त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली असून सर्वत्र शोध घेतला जात आहे. तरी वरील वर्णनाप्रमाणे तरुण आढळल्यास तातडीने संगमनेर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: youth has been missing for twenty three days
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News