शिर्डी: तरूणाचा हॉटेलच्या टेरेसवरून पडून मृत्यू, चार मित्र शिर्डीत अन…
Breaking News | Ahmednagar: चार मित्रांनी दारू प्यायली आणि ते फिरण्यासाठी हॉटेलच्या टेरेसवर गेले. तरूणाचा हॉटेलच्या टेरेसवरून पडून मृत्यू.
अहमदनगर: अहमदनगरमधून दारूची नशा जीवावर बेतल्याची घटना आज सकाळी समोर आलीय. अहमदनगर जिल्ह्यामधून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या तरूणाचा हॉटेलच्या टेरेसवरून पडून मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण दारूच्या नशेत होता. त्यामुळेच तोल जावून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवविला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र फिरण्यासाठी शिर्डीत आले होते. तेव्हा ते एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. परंतु या चार मित्रांनी दारू प्यायली आणि ते फिरण्यासाठी हॉटेलच्या टेरेसवर गेले. त्यावेळी शुभम नारखेडे या तरुणाचा दारूच्या नशेमुळे तोल गेला अन् तो थेट टेरेसवरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्यामुळे या तरूणाचा मृत्यू झालाय. या तरूणाचं वय २५ वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.
हॉटेलच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा शिर्डीत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. चार मित्र शिर्डीत साईदर्शनाला आले होते. मात्र, दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून पडून २५ वर्षीय शुभम नारखेडे या तरुणाचा मृत्यू झालाय. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरूआहे. पोलीस या प्रकरणी तरूणाच्या मित्रांची चौकशी करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शिर्डीला आलेल्या साईभक्ताचा मृत्यू झालाय. दारूच्या नशेत चौघेजण हॉटेलच्या टेरेसवर चढले. अंदाज न आल्याने एक मित्र खाली पडला, त्यातच त्याचा मृत्यु झालाय. शिर्डीनजिक निमगाव को-हाळे येथे हॉटेल साई सिमरन येथे हा प्रकार घडलाय. शुभम नारखेडे (वय 25 रा. शेंभा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा) येथील हा तरुण होता. शिर्डी पोलिसांच्या वतीनं अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.
Web Title: Youth fell from hotel terrace and died, four friends in Shirdi
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study