संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात तरुण बुडाला, शोधकार्य सुरू
Breaking News | Sangamner: पुलाला कठडे नसल्याने दुर्घटना, प्रवरा नदीच्या पात्रात ४३ वर्षीय तरुण बुडाला.
संगमनेर : प्रवरा नदीच्या पात्रात ४३ वर्षीय तरुण बुडाला, ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास संगमनेर आणि संगमनेर खुर्द गावाला जोडणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर घडली. विजय संभाजी कुटे (रा. रंगारगल्ली) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून, बुधवारी दुपारपर्यंत शोधकार्य सुरू होते.
संगमनेर खुर्द येथे एका खासगी रुग्णालयात विजय कुटे हा सुरक्षारक्षकाच्या ड्युटीसाठी दुचाकीवरून जात होता. तो प्रवरा नदीच्या पुलावर आला असता नदीच्या पात्रात पडला. दुचाकी पुलावरच पडली होती. भंडारदरा, निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. संगमनेर खुर्दजवळील अमरधाम येथून तो पडल्याची माहिती नदीपात्रात समोर आली आहे. याबाबत कुटे कुटुंबीयांना माहिती मिळाली. तातडीने शोधकार्य सुरू केले. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. विजय कुटे यांचे बंधू गणेश कुटे (रा. पम्पिंग स्टेशन) यांनी शहर पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी चार वाजेपर्यंत ते सापडले नव्हते.
संगमनेर आणि संगमनेर खुर्द गावाला जोडणारा प्रवरा नदीवरील पूल दळणवळणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. संगमनेर शहरातील चंद्रशेखर 3 चौक परिसरातून हा पूल थेट नाशिक-पुणे महामार्गाला जोडतो. मात्र, या पुलाला संरक्षक रेलिंग नाहीत. नदीला पाणी आल्यानंतर हा पूल धोकादायक बनतो. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने पात्राची खोली वाढली आहे. त्यामुळे या पुलाला संरक्षक रेलिंग बसवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Breaking News: Youth drowns in Pravara riverbed in Sangamner, search operation underway