अहमदनगर: उघड्या केबलच्या जॉईंटचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल
Ahmednagar Crime News: विद्युत खांबावरून विहिरीतील मोटारीसाठी अनधिकृतपणे टाकलेल्या उघड्या केबलच्या जॉईंटचा शॉक (Electric shock) लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.
कोपरगाव | Koaprgaon: विद्युत खांबावरून विहिरीतील मोटारीसाठी अनधिकृतपणे टाकलेल्या उघड्या केबलच्या जॉईंटचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील धोत्रे गावातील प्रकाश दत्तात्रय माळवदे (वय ३५) या तरुणाचा मृत्यू आहे. शवविच्छेदनानंतर विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के यांनी शेतमालक विनायक ज्ञानदेव घाटे (रा. धोत्रे, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मयत प्रकाश माळवदे व आरोपी विनायक घाटे हे धोत्रे गावच्या शिवारात शेजारी राहतात. घाटे यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या घराशेजारीच त्यांची शेती आहे. मृत प्रकाश माळवदे हे १७ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे लहान भाऊ संदीप माळवदे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
१८ फेब्रुवारीला संदीप माळवदे यांनी घराशेजारील विनायक घाटे यांचे शेतातील मका पिकात विजेचा शॉक लावून प्रकाश मयत झाला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिस आले. ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकाशाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता.
विनायक. यांनी त्यांच्या शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत खांबाच्या तारेवर अनधिकृतपणे आकडा टाकून अंदाजे १५० फूट केबल टाकून विहिरीतील मोटारीसाठी विद्युत पुरवठा आणला होता. या केबलला घाटे यांनी ठिकठिकाणी जॉईन्ट दिले होते, मात्र त्या जॉईन्टला सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते आवरण लावलेले नसल्याने त्याचा करंट लागून प्रकाश माळवदे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
तसेच शवविच्छेदनाच्या अहवालात देखील हा मृत्यू विजेचा करंट लागूनच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी विनायक घाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.
Web Title: Youth dies due to Electric shock from exposed cable joint, case registered
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App