Home अहमदनगर अहमदनगर:  साचलेल्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर:  साचलेल्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar:  पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.

Youth dies after falling into stagnant water

कोपरगाव: कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलीम अब्दुल पठाण (वय ३०) रा. लक्ष्मीनगर असे मयत तरुणाचे नाव असून तो मोलमजुरीचे काम करत होता.

लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची गळती अनेक वर्षांपासून थांबता थांबेना. पालिकेला अनेकदा निवेदन देऊन देखील पालिकेने पाण्याची गळती थांबवली नसून त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले आहे. पाण्याची रोज गळती होऊन हजारो लिटर पाणी टाकीच्या अवतीभोवती साचून राहत आहे. त्यामुळे टाकीच्या बाजूला साचलेल्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाला. मयत तरुण त्याच पाण्यात पडून मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासंदर्भात अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

पाण्याच्या टाकीच्या परिसरात पालिकेची शाळा असून त्या ठिकाणी लहान मुले देखील खेळतात. अशा धोकादायक व दलदल युक्त ठिकाणी पालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून अजून कुठलीही उपाययोजना केलेली नाही. आज झालेल्या घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून पालिका

प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी देखील पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरातील उघड्या नाल्यांत पडून एकाला आपला जीव गमवावा लागला होता. आता पन्हा ही दसरी घटना समोर आल्याने पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांचा जीव जाणार?, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

Web Title: Youth dies after falling into stagnant water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here