Home अहमदनगर अहमदनगर: धावत्या पिकअपमधून पडून युवकाचा मृत्यू

अहमदनगर: धावत्या पिकअपमधून पडून युवकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: धावत्या पिकअप गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना.

Youth dies after falling from running pickup Accident

अहमदनगर: धावत्या पिकअप गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना वाळुंजच्या (ता. नगर) शिवारात सोमवारी (दि. २७) पहाटे दोनच्या सुमारास घडली. बाळाजी माधव साकटवाड (वय २९, रा. मुखेड, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.

मृत बाळाजी व त्याचा चुलत भाऊ माधव ज्ञानोबा साकटवाड हे दोघे सोमवरी पहाटे पिकअप गाडी घेऊन बायपास रस्त्याने जात होते. माधव हा

गाडी चालवत होता, तर बाळाजी हा क्लिनर साइडला बसलेला होता. वाळुंज शिवारातील पुलाखाली बाळाजी याच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे तो पिकअपमधून खाली रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला माधवने तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

नगर: ट्रॅक्टरखाली दबून युवकाचा मृत्यू

वाळकी: ट्रॅक्टर चालवत असताना तो अचानक उलटल्याने त्या खाली दबून ट्रॅक्टर चालविणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे सोमवारी (दि. २७) दुपारी घडली. उदीत उत्तम सगळगिळे (वय २०, रा. नांदगाव शिंगवे, ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे.

मृत उदित हा सोमवारी दुपारी ट्रॅक्टर घेऊन शेतात चाललेला असताना ट्रॅक्टर अचानक उलटला. त्यात उदित ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ऋतुराज जाधव व इतरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Youth dies after falling from running pickup Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here