संगमनेर तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या- Suicide
Sangamner Suicide News: पठार भागातील कुरकुंडी गावच्या हद्दीतील वायळवाडी परीसरातील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावच्या हद्दीतील वायळवाडी परीसरातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.
रविंद्र दिलिप दिघे ( वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो कुरकुंडी गावा अंतर्गत असणाऱ्या वायळवाडी परीसरात राहत होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रविंद्र याने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्याची आई सायंकाळच्या सुमारास घराकडे आली असता तीच्या निदर्शनास ही गोष्ट आली. तर तीने एकच हंबरडा फोडला. आवाजाने आजुबाजुच्या नागरीकांनीही धाव घेतली व मृतदेह खाली घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. पुनाजी सावळेराम वारे यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Youth committed suicide by hanging in Sangamner taluka
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App