Home अहिल्यानगर अहिल्यानगर: लिंबाच्या झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्या

अहिल्यानगर: लिंबाच्या झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Suicide: वनविभागाच्या हद्दीत एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Youth committed suicide by hanging himself from a lemon tree

पारनेर:  तालुक्यातील जातेगाव येथील वनविभागाच्या हद्दीत एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ईश्वर अनिल आहेर (वय 21 रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट येथील वन विभागाच्या हद्दीत एका लिंबाच्या झाडाला युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती कारभारी पोटघन यांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलिसांना फोेनवर दिली.

सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा केला. मयत व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या पॅनकार्डवर ईश्वर अनिल आहेर असे नाव असल्याचे समोर आले.  आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सुनिल कुटे करत आहेत.

Web Title: Youth committed suicide by hanging himself from a lemon tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here