भाऊबीजेच्या दिवशी तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या, ‘अंत्यविधीचे पैसे खिशात’
Ahmednagar News: चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या भाऊबीजेच्या दिवशी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide).
कोपरगाव : माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, अशी चिठ्ठी लिहून तरुणाने ऐन भाऊबीजेच्या दिवशी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंत्यविधीसाठी लागणारे पैसे खिशात ठेवून विवाहित तरुणाने आपले जीवन संपविले. ही घटना बुधवारी कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली. सागर प्रदीप रांगोळे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सागर प्रदीप रांगोळे (वय ३९) हे मोहनीराजनगर येथील तांडेल बंगल्याजवळ राहात होते. भाऊबीजेच्या दिवशी (दि. १५) दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी राहात्या घरात छताच्या हुकाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, अशी चिठ्ठीही या सागर रांगोळे याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवली. माझ्या अंत्यविधीसाठी लागणारे पैसे शर्टच्या खिशात ठेवले आहेत, असा उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे. सागर रांगोळे हा विवाहित असून त्याला आठ वर्षांची मुलगी आहे. याबाबत मयत सागरचा भाऊ स्वप्निल प्रदीप रागोळे (रा. शारदानगर, कोपरगाव) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Youth committed suicide by hanging herself in her house
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App