Home अहमदनगर ऑडीओ क्लिप शेअर करून तरुणाची श्रीरामपूरात  रेल्वेखाली आत्महत्या – Suicide

ऑडीओ क्लिप शेअर करून तरुणाची श्रीरामपूरात  रेल्वेखाली आत्महत्या – Suicide

Shrirampur Suicide Case: रेल्वे लाईनच्या कडेला मोटारसायकल लावून अस्तगावच्या तरुणाने केली आत्महत्या.

Youth commits suicide under train in Srirampur by sharing audio clip

श्रीरामपूर: राहाता (Rahata) तालुक्यातील अस्तगाव येथील एका कामगाराने सूतगिरणी परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अस्तगाव येथील राहुल सुभाष सापते (वय 35) हा तरुण श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शेणखत त्याच्या स्वतःच्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून घेवून निफाड येथे विक्रीसाठी नेत असे. काल मात्र त्याने सूतगिरणी परिसरातील रेल्वे लाईनच्या कडेला मोटारसायकल लावून रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याची ओळख पटली नव्हती.

मात्र त्याने त्याच्या व्हॉटसअ‍ॅप वरून ऑडीओ क्लिप करून आत्महत्या करत असल्याचे त्याच्या अस्तगाव येथील चुलत भावाच्या मोबाईलवर टाकले होते. त्याच्या मोबाईलवरून त्याच्या चुलत भावाला संपर्क केला व त्यानंतर त्याची ओळख पटली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचेवर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Youth commits suicide under train in Srirampur by sharing audio clip

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here