Home पुणे तोंडावर स्प्रे मारून आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

तोंडावर स्प्रे मारून आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

Breaking News | Pune Crime: पुण्यातील कोंडवा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीने तोडांवर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला.

young woman working in an IT company was assaulted by spraying her face

पुणेः कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार झालेली तरुणी पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करते. ती आणि तिचा भाऊ दोघे एकत्र राहतात. मात्र तिचा भाऊ गावी गेला होता.

घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईल मधेसेल्फी काढला आणि परत येईल असे टाईप करुन ठेवले. बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणीने या बाबत कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेआरोपीने कुरिअर बाँय असल्याचे सांगत सोसायटी मधे प्रवेश केला. तरुणीने कुरिअर माझे नाही असे सांगितले, तरीही सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे तीने सेफ्टी डोअर उघडला आणि आरोपीने तोडांवर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला. पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाले असून फरार आरोपीचा शोध घेतला जातो आहे.

Breaking News: young woman working in an IT company was assaulted by spraying her face

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here