प्रियकरासोबत तरुणी गेली लॉजवर अन घडले असे की, धक्कादायक
Pune Murder Case: लॉजवर गेलेल्या तरुणी प्रेयसीचा तीक्षण हत्याराने गळा चिरून हत्या, या घटनेने खळबळ उडाली.
पुणे: प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या तरुणी प्रेयसीचा तीक्षण हत्याराने गळा चिरून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे येथील स्वारगेट सातारा रस्त्यावरील एका लॉजवर काल रात्री ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी कामगार रूमची साफ सफाई करण्यासाठी गेला असता पाहणी केली असता बाथरूम मध्ये तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
दिप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत दिप्ती ही आपल्या प्रियकरसोबत रविवारी रात्री लॉजवर आली होती.
दरम्यान, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रुमची साफसफाई करण्यासाठी लॉजवरील कर्मचारी रूममध्ये गेला असता, त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. दिप्तीची हत्या तिच्याच प्रियकराने केली असावी असा पोलिसांना संशय आहे. दिप्ती रविवारी रात्री आपल्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती. त्यामुळे फरार झालेल्या प्रियकराचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: a young woman who went to the lodge was stabbed and murder a sharp knife