Home पुणे गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार, धमकी देऊन तरुणीकडून खंडणी उकळली

गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार, धमकी देऊन तरुणीकडून खंडणी उकळली

Breaking News | Pune: गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार, फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण, धमकी देऊन तरुणीकडून 3 लाख 80 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार.

young woman was raped by taking gungi medicine, extorted ransom from the young woman

पुणे: पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार केला मग त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले. पुढे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून 3 लाख 80 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत  26 वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सद्दाम सय्यद (वय 26) याच्याविरुद्ध बलात्कार, खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑगस्ट 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित तरुणी आणि आरोपी सद्दाम एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. त्यामुळे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कामानिमित्त हॉटेलमध्ये थांबल्यानंतर सद्दाम याने तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध हा अमली पदार्थ दिला. त्यामुळे तरुणीला गुंगी आली. यानंतर त्याने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. सद्दाम याने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण आणि फोटोदेखील काढले. पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून 1 लाख 2 हजार 850 रुपये ऑनलाइन घेतले. तसेच 2 लाख 78 हजार रुपये रोख जबरदस्तीने घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव करीत आहेत.

Web Title: young woman was raped by taking gungi medicine, extorted ransom from the young woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here