आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये धारदार शस्त्राने तरुणीवर हल्ला, तिचा मृत्यू
Breaking News | Pune Crime: तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू.
पुणे : पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारे (28 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. शुभदाच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (30 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून काम करत होती. तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरुन वाद सुरू होता. यातूनच आरोपीने हा हल्ला केला. आरोपीने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण अतिरिक्त रक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
Web Title: young woman was attacked death with a sharp weapon
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News