Ahilyanagar: नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: पोलिस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून रेल्वे पोलिसाने एका ३१ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना.
श्रीरामपूर : पोलिस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून रेल्वे पोलिसाने एका ३१ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना शहरातील वॉर्ड क्रमांक ५ परिसरात घडली.
पीडित महिलेवर बलात्कार करणारा आरोपी ज्ञानदेव आढाव हा रेल्वे पोलिस दलात नोकरीस आहे. त्याने पीडितेला विश्वासात घेत तिचा मोबाइल क्रमांक घेत त्यावर वेळोवेळी मेसेज पाठविले, तिला नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून बलात्कार केला. पीडिता ही राहुरी तालुक्यातील असून, तिने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बलात्कार प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव आढाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Web Title: Young woman raped with the lure of a job