Missing: राहत्या घरातून तरुणी बेपत्ता
राहाता | Rahata: राहाता येथील 19 वर्षीय तरुणी राहत्या घरातून बेपत्ता (Missing) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कु. ॠतुजा गंगाधर भुजबळ (रा. 15 चारी) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. याबाबत तीचे वडील गंगाधर तयाराम भुजबळ यांनी राहाता पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
ॠतुजा ही 25 एप्रिल रोजी सकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान राहत्या घरातून कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे. त्यांच्या घराच्या आजूबाजूला राहाता, पिंपळस गावात शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही.
राहता पोलिसांत तिच्या वडिलांनी माहिती दिली असून त्यावरुन राहाता पोलिसांनी मिसींग रजि. नंबर 23/2022 दाखल केली आहे.
सदरची मुलीची उंची 5 फुट 3 इंच आहे. रंगाने गोरी, डोळे घारे, कपाळ उंच, केस लांब, गुलाबी रंगाचा कुर्ता व काळे रंगाची पँट असे कपडे परिधान केले आहेत. पायात चप्पल असे वर्णन आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ. दिलीप तुपे करत आहेत.
Web Title: young woman Missing from the house