कारच्या धडकेने तरुणी 12 फूट उडून खाली पडली, अपघाती मृत्यू, पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव
Accident News: पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीला कारने पाठीमागून धडक.
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर अपघात घडला असून यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार 2 मार्च 2023) सकाळी 6 वाजता घडली. पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी 12 फूट उंच उडून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला.
कन्याकुमारी कृष्णा भोसले या 19 वर्षांच्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. कन्याकुमारी ही वसमत तालुक्यातील आंबा गावातील रहिवासी होती.
अधिक माहिती अशी की, कन्याकुमारी धावण्याचा सराव करत होती. तिच्या सोबत आणखी 2 जणी होत्या. पण त्या थोड्या पुढे होत्या. यामुळे कारची धडक एकट्या कन्याकुमारीला बसली. पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.
कारची जोरदार धडक बसल्यामुळे कन्याकुमारी ही 19 वर्षांची तरुणी 12 फूट उंच उडून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे कन्याकुमारीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने नेमके काय घडले हे लक्षात येताच घटनास्थळावरून पलायन केले. एका शेतकऱ्याने आणि कन्याकुमारीसोबत धावण्याचा सराव करत असलेल्या दोघींनी अपघात झाल्याचे बघून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कन्याकुमारीचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Young woman falls 12 feet after being hit by car, accident death
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App