हातावर लिहिलं सॉरी आई बाबा! दुधाची पिशवी आण्यासाठी गेली अन्.
Breaking News | Amravati Suicide Case: अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने तापडीया मॉलच्या पाठीमागील सातुर्णा परिसरातील ११ मजली इमारतीवरून उडी टाकून जीवन संपविले.
अमरावती: एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने तापडीया मॉलच्या पाठीमागील सातुर्णा परिसरातील ११ मजली इमारतीवरून उडी टाकून जीवन संपविले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.आहे. सदर घटनेचा पोलीसांनी तपास सुरु केला आहे. पोलीसांना तिच्या घरातून उडी मारण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. पोलीसांनी संबंधित चिठ्ठी जप्त केली आहे, केवळ पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने आपण संपवत असल्याचे अल्पवयीन मुलीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
अल्पवयीन मुलगी साई नगर परिसरातील चंदननगर इथली रहिवासी आहे. दूध पाकीट आणण्याचं निमित्त करुन अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली होती. ती थेट जवळील एका ११ मजली इमारतीमध्ये शिरली. तिथे तिने दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली आणि थेट इमारतीच्या छतावर पोहोचली. यानंतर क्षणाचा विलंब न करता अल्पवयीन मुलीने इमारतीवरुन उडी मारुन मृत्यूला कवटाळले. हा गंभीर प्रकार घडलेल्या घटनास्थळी पोलीसांना मोबाईल सापडला. मोबाइल ट्रेस करुन पोलीसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.
राजापेठ पोलिसांनी आज अल्पवयीन मुलीच्या घराची पोलीसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी उडी मारण्यापूर्वीची सदर चिठ्ठी लिहलेली सापडली.यामध्ये तिने आई वडिलांची माफी मागितली आहे. याप्रकरणाचा पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Web Title: Young Woman ended his life by jumping from an 11-storey building
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study