अहिल्यानगर: लग्न मोडल्याने तरुणीची आत्महत्या, तिघांवर गुन्हा
Breaking News | Ahilyanagar Suicide: जमलेले लग्न मोडल्याने 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
जामखेड: जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महीन्यातच या लग्नास नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीचे वडील सतिष दादासाहेब सुरवसे (रा. डीसलेवाडी ता. जामखेड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मुलाकडील मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे (हल्ली रा. चिखली कदळवाडी मोशी ता. चाकण जि. पुणे, मुळ रा. कर्जत) अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (हल्ली. रा. कर्जत ता. कर्जत जिल्हा. अहिल्यानगर अशा तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि. 27 मार्च 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे की मृत मुलगी मोनिका सतिष सुरवसे (वय 22 वर्षे रा. डिसलेवाडी ता. जामखेड) हिचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर दि. 18 फेब्रुवारी 2025 ते 27 मार्च 2025 रोजी पर्यंत आरोपी मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे याने मुलीस वेळोवेळी म्हणत होता की तु मला आवडली नाही, मला तु मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणुन मयत मोनिका हीस अपमानित केले. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (रा. कर्जत) हे फीर्यादी मुलीच्या वडीलांना म्हणत होते की तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभुन दिसत नाही.
त्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले व या कारणावरून माझ्या मुलीने मानसिक त्रासामुळे दि 27 मार्च 2025 रोजी दुपारी 11 ते 02 वाजण्याच्या पुर्वी डिसलेवाडी येथे राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिल आशा तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. 27 रोजी म्हणजे त्याच दिवशी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवलकर हे करीत आहेत.
Web Title: Young woman commits suicide due to marriage breakup