अहमदनगर: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वसतिगृहात नर्स तरुणीने गळफास घेत आत्महत्या
Ahmednagar News: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग वसतिगृहात नर्सने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर: येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग वसतिगृहात नर्सने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ऋतीका पांडुरंग आंधळे (वय 19 मुळ रा. गिरेवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. नर्सिंग वसतिगृह, जिल्हा रुग्णालय) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात नर्सिंग वसतिगृह आहे. या वसतिगृहातील रूम नंबर 77 मध्ये ऋतीका पांडुरंग आंधळे या राहत होत्या. त्यांनी शनिवारी रात्री रूममध्येच दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस अंमलदार मरकड यांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत ऋतीका आंधळे हिने आत्महत्या का केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील आंधळे करीत आहेत.
Web Title: Young nurse committed suicide by hanging herself in the hostel
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App