Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: संकुलाच्या आत मॉर्निंग वॉक ट्रॅकवर कोसळून मृत्युमुखी.
छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक वादातून गणेश जगन्नाथ दराखे (३५, रा. एन-११) यांची भररस्त्यावर तिघांनी गळा चिरून खून केला. शनिवारी सकाळी ६ वाजता एसबीओए शाळेच्या मागील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाबाहेर ही घटना घडली. गळा कापल्यानंतर गणेश जवळपास २०० मीटर चालत जीव वाचविण्यासाठी आकांताने मदतीसाठी याचना करीत होते. संकुलाबाहेरील रस्त्यावरून ते संकुलाच्या आत मॉर्निंग वॉक ट्रॅकवर कोसळून मृत्युमुखी पडले. याप्रकरणी कुटुंबातील एका संशयिताचीरात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. तीन मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले होते.
गणेश कुटुंबासह चिकलठाण्यात राहत होते. दोन महिन्यांपूर्वी घर विकून ते पत्नी, लहान मुलगा, मुलीसह एन-११ परिसरात भाडेतत्त्वावर राहत होते. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील व एका भावाचे निधन झाले. त्यानंतर आई व लहान भाऊ वेगळे राहत होते. शनिवारी सकाळी ६ वाजता ते कामावर जाण्यासाठी पायी जळगाव रोडच्या दिशेने जात असताना तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ गणेश यांना पकडून दोन कारच्या मध्ये नेत मारहाण सुरू केली. त्यानंतर दोघांनी पळ काढला. मात्र, एकाने जवळपास ३० ते ४० सेकंद त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून पळ काढला. गणेश जखमी अवस्थेत रस्त्यावर चालत होते. मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांनी त्यांना पाहून आरडाओरडा करत पळ काढला. गणेश जीव वाचविण्यासाठी आकांताने मदतीची याचना करीत होते. मात्र, संकुलाच्या आत जाऊन ते ट्रॅकवर मृत्युमुखी पडले.
Web Title: young man’s throat was cut by three
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study