धक्कादायक! हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणाला गोळ्या झाडून संपवलं
Breaking News | Indapur Crime: जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून (Shot Dead) केल्याची घटना.
इंदापूर: इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्या डोक्यातही गोळी लागली.गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते.
Web Title: young man who went to eat at the hotel was shot dead
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study