Home अहमदनगर अहमदनगर: पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

अहमदनगर: पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

Breaking News | Ahmednagar: तरुण मालुंजा माहेगाव येथील बंधाऱ्यात बुडाल्याची घटना.

young man who went swimming drowned

श्रीरामपूरः तालुक्यातील मालुंजा बुद्रूक – येथील तरुण मालुंजा माहेगाव येथील बंधाऱ्यात बुडाल्याची घटना शनिवारी – दुपारी घडली. तरुणाला शोधण्याचे काम सुरू आहे. किरण चांगदेव तोगे (वय २२, रा. मालुंजा बुद्रुक) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातो असे, म्हणून परिसरातील मालुंजा माहेगाव येथील बंधाऱ्यात किरण व त्याचे सहकारी – तरुण गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी – पाण्यात उड्या मारल्या. पोहत पोहत – दुसऱ्या बाजूला गेले, परंतु माघारी येतांना किरण यास दम लागल्याने तो पाण्यात बुडाला असल्याचे तरुणांनी सांगितले. सदर तरुणांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले. त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी सदर घटनेची माहिती गावात सांगितली.

माहिती समजतात ग्रामस्थांसह सरपंच अच्युतराव बडाख हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाडगावचे पोलिसपाटील भांड यांना घटनेची माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन श्रीरामपूर पोलिस ठाण्यास कळवले.

श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक तसेच नायब तहसीलदार वाकचौरे घटनास्थळी दाखल झाले. किरणचा शोध घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

किरण हा एकुलता एक होता. एक महिन्यापूर्वी तो श्रीरामपूर येथे टाटा फायनान्समध्ये नोकरीस लागला होता. त्याने एम. बी. ए. पूर्ण केले होते. कालच (शुकवारी) त्याचा पहिला पगार झाला होता.

Web Title: young man who went swimming drowned

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here