ब्रेकिंग न्यूज! तरुणाचा मित्रानेच केला खून, मृतदेह उसाच्या शेतात टाकला
Breaking News Ahmednagar: महिन्यापूर्वी मिसिंग असलेल्या तरुणाच्या खुनाची (Murder) उकल, आरोपीला अटक(Arrested).
राहाता: शहरातील गौरव पंडित शिरसाठ (वय ३० वर्ष) ह्या मिसिंग असलेल्या तरुणाच्या खुनाची उकल झाली असून मित्रानेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन व गळा दाबून शिरसाठ याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत शिरसाठ याचा मित्र आरोपी किरण बबन मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शुक्रवारी राहाता येथे पत्रकार परिषद घेऊन या खुनाच्या गुन्ह्या संदर्भातील माहिती प्रसार माध्यमांना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव पंडित शिरसाठ (वय ३०, रा. साई समर्थनगर, राहाता) हा १० नोव्हेंबर २०२३ पासून मिसिंग होता. त्याबाबत वडील पंडित पुंजाजी शिरसाठ यांनी दि १३ नोव्हेंबर रोजी तो मिसिंग असल्याची खबर राहाता पोलीस स्टेशनला दिली होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांनी तपास सुरू केला होता. दरम्यान मिसिंग व्यक्ती शिरसाठ याचा मित्र किरण मोरे हा सुद्धा १४ नोव्हेंबर २० २३ पासून घरी नसल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मालकर व पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत गोपनीय बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गतीने तपास सुरू केला. त्यावेळी सदर मिसिंग व्यक्तीसोबत घातपात झालेला असावा अशी शक्यता वाटली तसा संशय पोलिसांना निर्माण झाला. त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता. पोलीस वेळोवेळी त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधत होते. बराच काळ आरोपी राज्याच्या बाहेर होता. त्यानंतर त्याला २८ डिसेंबर २३ रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी मोरे याने मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाठ याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे शेतात फेकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले. मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ६६५ / २०२४ भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून या खुनाचे गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेप्रमाणे व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे निर्देशानुसार शिर्डी उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक झिने, पोलीस नाईक नरोडे व पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांनी केलेला आहे.
Web Title: young man was murder by his friend, the body was dumped in the sugarcane field
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News