संगमनेर शहरात तरुणाचा चिरडून मृत्यू, डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू.
Breaking News | Sangamner: चौफुलीवर एका मालट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू.
संगमनेर: शहरातील नवीन अकोले रोडवरील इदगाह मैदानाच्या कोपऱ्याजवळील चौफुलीवर एका मालट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खांडगाव येथील एक तरुण आपल्या दुचाकीवरून नवीन अकोले रोडवरून जात होता. यावेळी माल ट्रक क्रमांक एम एच ४२ ए ९२४२ हा ट्रक अकोलेच्या दिशेने जात होता. या ठिकाणी चौफुली असून रस्त्याच्या कडेला भाजीपाला बाजार भरतो. त्यामुळे
नेहमीच गर्दी असते. वाहतूक संथ आणि जाम देखील असते. दरम्यान मोठा ट्रक आणि शेजारी दुचाकीस्वार यांना एकमेकांच्या वाहनांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली सापडला. यात युवकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. पोलिस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयत तरूणांला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले.
अपघातानंतर मयत तरुणांच्या गाडीत आधार कार्ड सापडले असून त्यावर ओम गणेश गुंजाळ (रा. खांडगाव) असे नाव आहे.
Breaking News: young man was crushed to death in Sangamner city