Murder: तरुणाची गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घुण हत्या
एका तरुणाचा गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार.
सांगली : सांगलीच्या जतमध्ये खुनांचे सत्र सुरूच आहे. मागील १५ दिवसांतील ही आठवी घटना आहे. जिल्ह्यातील आता जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोडजवळ एका तरुणाचा गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की, शशिकांत बिरा मदने (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून घरापासून काही अंतरावर शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आाला आहे. शशिकांत मदने हा ट्रॅक्टर चालक असून, या खुनामागील कारण अद्याप समोर आले नाही.
गेल्या काही दिवसांपासून जत शहरात सतत हत्येच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोसारी येथे दोघा जणांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ जत शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एका तरुणाची निर्घृण हत्येची घटना घडल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: young man was brutally murder by slitting his throat and crushing him with a stone
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App