अहमदनगर ब्रेकिंग! पत्नीसमोरच कोयत्याने वार करून तरुणाची निर्घुण हत्या
Breaking News | Ahmednagar: अज्ञात चौघांनी घरात घुसून महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या देखत तिच्या पतीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून. (killed).
श्रीगोंदा: तालुक्यातील कोथुळ या गावात अज्ञात चार व्यक्तीनी घरात घुसून सोमवारी (दि.३०) पहाटे तरुणावर कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ३०) पहाटे ही घटना घडली.
अज्ञात चौघांनी घरात घुसून महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या देखत तिच्या पतीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. योगेश सुभाष शेळके (वय ३३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून
याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात मयताची पत्नी आरती योगेश शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मयत योगेश हा गेल्या पाच वर्षांपासून कोथूळ येथे पत्नी, दोन मुले व आई वडिलांसह राहत होता. त्याचा शेती व्यवसाय होता. सोमवारी रात्री शेळके कुटुंबीय झोपले तेव्हा मध्यरात्र उलटल्यानंतर अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा वाजविल्याने आरती शेळके यांनी घराचा दरवाजा उघडला.
दरवाजासमोर उभ्या असलेल्या चार इसमांनी घरात प्रवेश करत आरतीच्या गळ्ळ्याला कोयता लावून ‘तू काही बोललीस तर तुला मारून टाकीन’, असा दम दिला. तर उर्वरित तिघांनी फिर्यादी योगेश शेळके याच्याजवळ जाऊन काहीच न बोलता कोयत्याने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. यावेळी योगेशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मारेकऱ्यांनी त्याच्या हाता-पायावरही वार केले. या घटनेत योगेश जागीच ठार झाला.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संतोष भंडारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जमिनीच्या वादातून झाली का आणखी काही कारण आहे? याचाही पोलिस शोध घेत आहेत.
Web Title: young man was brutally killed by stabbing him in front of his wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study