एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर, वेळोवेळी अत्याचार अन..
Ahmednagar News: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी केल्याप्रकरणी तरुणाला अटक (Arrested).
श्रीरामपूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी केल्याप्रकरणी तरुणाला शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्यावर फसवणूक व अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अरबाज एजाज बागवान (वय २३, रा. संजयनगर, श्रीरामपूर) असे आहे. याप्रकरणी १९ ऑगस्टला शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केल्यावरून आहे. गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अरबाज बागवान याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यापासून एक मुलगा झाला. आता पुन्हा त्याच्यापासून सात महिन्याची गरोदर आहे. बागवान याला लग्नाबाबत विचारणा केल्यास तो मारहाण करतो. योग्य वेळ आल्यावर लग्न करीन, असे सांगतो. मात्र बागवान शहरातील अन्य एका मुलीशी लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने आपली फसवणूक केली आहे, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. २ सप्टेंबरला संजयनगर येथील त्याच्या राहत्या घरी रात्री बारा वाजेच्या दरम्यान आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सदर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 376, 420, 406, 506, 34 प्रमाणे अरबाज विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याचे आदेश दिले.
Web Title: young man was arrested for sexually assaulting a woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App