Accident: संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच ठार
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायत हद्दीत काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत (Accident) काळ्या रंगाची व लाल पांढरे पट्टे असलेली हिरो डिलक्स या दुचाकीस्वार वरील तरुण नितेश बालाजी पुरी वय २१ रा. पुणे येथील हा जागीच ठार झाला आहे.
त्याला कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत माहिती मिळू शकली नाही. सदर वाहन मात्र घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती संगमनेर येथील पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान घटनास्थळी मेडीकोवर रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाली होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. अज्ञात वाहनाने मयत तरुणाला बरेच फुट फरफटत नेले असल्याचे व डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत होते. व घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. मयत तरुण पुणे येथील असल्याचे समजते. त्यांच्या नातेवाईकाना पोलिसांनी कळविले.
Web Title: young man on a two-wheeler was killed on the spot in an unidentified vehicle collision Accident