Home बीड मराठा आरक्षण व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन तरुणाने घेतला गळफास

मराठा आरक्षण व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन तरुणाने घेतला गळफास

Breaking News | Beed: आरक्षण मिळत नसल्याने आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना.

young man hanged himself by putting a status on Maratha reservation WhatsApp

आष्टी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या तरूणाने आरक्षण मिळत रविवारी नसल्याने पहाटेच्या सुमारास आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. प्रवीण दिलीप सोनवणे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा बीसीए शिकला असून आरक्षण मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसापासून नैराशात होता. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने तो सध्या बेरोजगार होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. लढा उभारून देखील प्रवीण सोनवणे आरक्षण मिळत नसल्याने त्याने रविवारी मोबाईलवर स्टेटस ठेऊन पहाटेच्या दरम्यान स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रवीण सोनवणे याचे वडील गेल्या काही वर्षांपूर्वीच मयत झालेले आहेत. घरामध्ये तो एकुलता एक मुलगा असून घराची सर्व जबाबदारीत्याच्या खांद्यावर होती.

Web Title: young man hanged himself by putting a status on Maratha reservation WhatsApp

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here