Home अहमदनगर अहिल्यानगर: शाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग तरुणावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर: शाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग तरुणावर गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची घटना.

young man for molesting a school going girl

राहुरी:  शाळेत जात असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली. या घटनेबाबत आरोपी सार्थक वांढेकर याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी चार वाजेदरम्यान पीडित मुलगी शाळेतून घरी जात आला आहे. या घटनेतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी नेहमी शाळेत ये-जा करीत असताना या घटनेतील आरोपी सार्थक वांढेकर हा गेल्या एक महिन्यापासून तिचा पाठलाग करत होता. काही दिवसांपूर्वी होती. तेव्हा आरोपी सार्थक वांढेकर तिला म्हणाला, तु माझ्या सोबत का बोलत नाही, तु माझ्या सोबत बोलत जा, माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणून त्याने पीडित मुलीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तेव्हा पीडित मुलगी माझा हात सोड, असे म्हणाली असता आरोपी सार्थक याने तिला मारहाण केली. तसेच तु माझ्यासोबत बोलली नाही, तर मी तुला मारून टाकील, अशी धमकी दिली. याबाबत पीडित मुलीचे राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

तिच्या फिर्यादीवरून आरोपी सार्थक अण्णासाहेब वांढेकर (रा. वांबोरी, ता. राहुरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८ (२), ११५ (२), ३५१ (३) सह पोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहे.

Web Title: young man for molesting a school going girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here