Home बीड सावकार माजले! थकीत कर्जापोटी तरुणाने चिट्ठी लिहून संपविले जीवन

सावकार माजले! थकीत कर्जापोटी तरुणाने चिट्ठी लिहून संपविले जीवन

Beed Suicide Case: हात उसणे दिलेल्या थकित रकमेपोटी मोटारसायकल ओढून नेल्यामुळे सुकळी (ता. केज) येथे युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.

young man ended his life by writing a letter due to an outstanding debt

केज: हात उसणे दिलेल्या थकित रकमेपोटी मोटारसायकल ओढून नेल्यामुळे सुकळी (ता. केज) येथे युवकाने गळफास घेत जीवन संपवले. मृताचे नाव अमोल विलास काटकर वय (३५ वर्ष) असे आहे. तो ट्रक ड्रायव्हरचे काम करत होता. शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेवून त्याने जीवन संपवले.

कुरण नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. अमोल यांच्या पँटच्या खिशात एक मोबाईल मिळून आला. त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एका वहीच्या पानावर हाताने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली.

या चिठ्ठीत गणेश धर्मराज मुंढे (रा. पहाडी पारगाव ता. धारूर) आणि त्याचा साथीदार रमेश देवराव थोरात रा. सुकळी (ता. केज) या दोघांनी आपली हिरो पेंशन प्रो (एम एच-२४/ए ए-८५८७) ही मोटरसायकल ओढून नेल्याचा उल्लेख केला आहे. या मानसिक तणावातून जीवन संपवत असल्याचे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे हे तपास करीत आहेत. शेंडगे म्हणाले, “मुंढे हे ऊसतोड मुकादम आहेत, आणि त्यांचे पैसे अमोल यांच्याकडे होते. त्यातून अमोल यांची मोटरसायकल ओढून नेली होते, असे दिसून येते. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.” अमोल याचे बंधू विनोद काटकर यांनी याला दुजोरा दिलेला आहेत. विनोद यांनी या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे. अमोल यांनी चिठ्ठीत मुंढे आणि थोरात यांना जबाबदार धरले आहे, त्यामुळे या दोघांना अटक करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

Web Title: young man ended his life by writing a letter due to an outstanding debt

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here