स्वतःच्या मोबाइलवरून व्हिडियो व्हायरल करून तरुणाने संपविले आयुष्य
Crime News: तीन जणांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलवरून व्हायरल करून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
बोरी | परभणी: गावातील तीन जणांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलवरून व्हायरल करून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी नऊ वाजता जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे घडली आहे. माउली रावसाहेब जावडे (२७, रा. चिंचोली काळे, ता. जिंतूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत माउली जवडे या तरुणाचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. आत्महत्येस जबाबदार आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी बोरी पोलिस ठाण्यात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
Web Title: young man ended his life Suicide by making the video viral from his own mobile phone
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App